Headlines

आडवली नं. 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविले आयुर्वेदिक ‘निर्मल उटणे

⚡मालवण ता.१७-:विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यवसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नं 1 शाळा विविध उपक्रम राबाविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उटणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ श्री. अरुण लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. हे उटणे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविले असून चंदन, मुलातांनी माती, आंबेहळद,…

Read Full News

मालवण रॉक गार्डन अंधारात…

स्थानिक व्यावसायिक त्रस्त; वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा शिल्पा खोत यांचा इशारा ⚡मालवण,ता.१६-:पर्यटकांचे खास आकर्षण असलेले येथील रॉक गार्डन सध्या वीज पुरवठ्या अभावी सायंकाळच्या वेळेस पूर्णतः काळोखात गेले आहे. ऐन पर्यटन हंगामात रॉक गार्डन अंधारात बुडाल्याने पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर झाला आहे. या गंभीर समस्येची दखल…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना नवोदय विद्यालय सांगेलीच्या पालक-शिक्षक परिषदेची सदिच्छा भेट…

बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथील पालक-शिक्षक परिषद सदस्यांनी सिंधुनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.अलिकडेच जिल्हाधिकारी सौ. धोडमिसे यांनी नवोदय विद्यालय सांगेली येथे व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शाळेच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर पालक-शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार…

Read Full News

८ नोव्हेंबर रोजी शिक्षकांचे आंदोलन…

सर्व शिक्षक संघटना एकवटल्या.. ओरोस ता १६सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, अशैक्षणिक कामे, तसेच वेळोवेळी उद्भवलेल्या प्राप्तकालीन समस्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनानी स्वतंत्रपणे व सर्व संघटना एकत्र येऊन निवेदने ,प्रत्यक्ष भेट घेऊन, चर्चा, आंदोलने करूनही आजपर्यंत कोणताही विषय परिपूर्ण सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या ढिसाळ कारभारा विरोधात महाराष्ट्र राज्य…

Read Full News

जिल्हयातील ३.६० लाख वीज ग्राहकांवरचा अमानुष अन्याय थांबवा…

वीज ग्राहक संघटनेची महावितरणकडे मागणी:स्मार्ट मित्र बसविण्यास तीव्र विरोध.. कुडाळ : स्मार्ट मीटर विरोधातील वीज ग्राहकांचा रोष आता वाढू लागला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मीटर घरोघरी बसविले जात आहेत. या मीटरमुळे वीजबिलात दुपटीने आणि तिपटीने वाढ होऊन ग्राहक हैराण झाला आहे. आता हे स्मार्ट मीटर बसवून घेणार नाही अशी भूमिका वीज ग्राहकांनी घेतली आहे….

Read Full News

टीईटी सक्तीबाबत शिक्षक वर्गात असंतोष; सिंधुदुर्गातील शिक्षकांना दिलासा द्यावा…

मंगेश तळवणेकर:मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर.. सावंतवाडी ता.१७-: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल शिक्षक वर्गामध्ये असंतोष वाढला आहे. या विषयावर लक्ष वेधण्यासाठी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून टीईटी सक्तीचा निर्णय…

Read Full News

सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांची दिवाळी गोड…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून ९० कोटींची आंबा-काजू विमा नुकसानभरपाई वितरण… सिंधुदुर्गनगरी या १६शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यास थोडा विलंब झाला असला तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यास आम्ही यशस्वी झालो. याचा आनंद आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होइल असे सांगतानाच प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यपद्धतीने पार पाडल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे सांगत…

Read Full News

फळ पीक विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितीयोजनेमध्ये जिल्ह्यातील ४३ हजार आंबा – काजू बागायतदारांचा सहभाग.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री नितेश…

Read Full News

न्हावेली गावात गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी…

⚡सावंतवाडी ता.१६-:तालुक्यातील न्हावेली गावातील ग्रामस्थांनी वाढत्या वाहनवाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून, शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आणि वस्ती भागात वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने…

Read Full News

माणगाव दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्सवाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१६-: श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या स्थापित श्री दत्त मंदिर, माणगाव (ता. कुडाळ) येथे येत्या शनिवार दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री गुरुद्वादशी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. सकाळी अभिषेक पूजा, लघुरुद्राभिषेक तसेच दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी श्री. सुभाष परवार व सहकारी, गोवा…

Read Full News

You cannot copy content of this page