⚡मालवण ता.३०-:
विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण यांनी मालवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन त्यांना बजरंग दलाच्या कार्याविषयी माहिती दिली.
बजरंग दलाच्या कार्याचा विस्तार तसेच हिंदू राष्ट्र हिताच्या दृष्टीने बजरंग दल वेळोवेळी करीत असलेले सामाजिक कार्य, तसेच गोरक्षण, तसेच हिंदू धर्म रक्षणाच्या दृष्टीने बजरंग दल करीत असलेले कार्य या सर्व कार्यावर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच गरज भासेल त्या त्यावेळी सामाजिक कार्यात पोलिसांनाही सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बजरंग दलाच्या वतीने मालवण पोलिसांना देण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषद मालवण तालुका अध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल संयोजक श्रीराज बादेकर, सहसंयोजक गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, प्रसाद हळदणकर, अमोल गावडे, देविदास परब, मुकुंद घाडीगावकर, दिनेश आंगणे, ललित चव्हाण, आनंद गावकर व इतर बजरंगी उपस्थित होते.