⚡मालवण ता.३०-:
यशाच्या भागीदारीत गुरूच्या स्थानाला तोड नसून विदयार्थी घडविण्यामागे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था या सर्व घटकांची मेहनत आहे दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय,कटटा, वराडकर इंग्लिश मिडिअम स्कूल तसेच डॉ. दादासाहेव वराडकर कला व वाणिज्य महाविदयालय कटटा या तिन्ही विभागातील यश मिळविलेले विदयार्थी म्हणजे रत्ने असून प्रशालेच्या उज्ज्वल परंपरेतील सुवर्णक्षराने लिहीण्याजोगा क्षण आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाशिक्षक श्री. सागर बगाडे यांनी कट्टा येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय (संयुक्त) कट्टा, वराडकर इंग्लिश मिडिअम स्कूल तसेच डॉ. दादासाहेव वराडकर कला व वाणिज्य महाविदयालय कटटा या तिन्ही विभागातील दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कट्टा पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बगाडे हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर मालवणचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, मंडळाचे उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर सचिव श्री सुनिल नाईक स्कुल. कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, सहसचिव साबाजी गावडे खजिनदार श्री. रविंद्रनाथ पावसकर स्मिता कम्प्युटर च्या संचालिका सौ. श्रध्दा नाईक मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, माजी विदयार्थी जयेंद्र परब, इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी पर्यवेक्षक श्री. महेश भाट आदी वा इतर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे स्वागत केले
यावेळी गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण यांनी आपण या प्रशालेचे माजी विदयार्थी असून जीवनातील खडतर प्रसंगातून आपला प्रवास झाला असून या साठी योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या प्रेरणेतून आज एका उच्च पदावर पोहचण्याची संधी मिळाली असे सांगून विद्यार्थ्यांनी योग्य दिशा व मेहनतीच्या माध्यमातून यशस्वी व्हावे व आपल्या प्रशालेचे पर्यायाने समाजाचे ऋण फेडण्यास सक्षम व्हावे असे आवाहन केले तर
कार्यकमाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी गुणवंत विदयार्थ्यांचे अभिनंदन करीत प्रशालेतील यश मिळविलेल्या गुणवंत विदयार्थ्यांनी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.
यावेळी इ.१० वी, १२ वी च्या तसेच डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविदयालयाच्या गुणवंत विदयार्थ्यांचा तसेच संस्था स्तरावर असणाऱ्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पेंडूरकर सौ. विणा शिरोडकर, कु. संपदा फोपळे कु. के. व्हि. खानोलकर यांनी केले