कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे…

बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता..

कुडाळ : कुडाळ हायस्कूल आणि जि प पडतेवाडी शाळेसमोर कुडाळ नगर पंचायतच्या वतीने रंबलर पट्टे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी पुढाकार घेतला आहे.
कुडाळ हायस्कुल आणि पडतेवाडी शाळेसमोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दिवसापूर्वी कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे मारुन विद्यार्थी वर्गाची काळजी घेतल्याने सभापती उदय मांजरेकर यांचे पालकवर्गाने आभार मानले आहेत.
कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी शाळे जवळ वाहनांची वर्दळ असते आणि विद्यार्थी वर्गाची वर्दळ जोरदार होत असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते याची दखल घेत कुडाळ नगरपंचायत बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी ऑन द स्पाॉट जाऊन अधिकारी यांच्यासोबत पहाणी करुन रंबलर पट्टे मारण्याची सुचना नगरपंचायतीला दिली होती आणि त्याचा पाठपुरावाही केला होता. आज बसवलेल्या या रंबलर पट्ट्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होणार आहे. त्यामुळे अपघात होणार नसुन कुडाळ मधील पालकांनी आणि कुडाळ हायस्कूल शिक्षक तसेच पडतेवाडीमधील शिक्षक यांनी श्री मांजरेकर यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page