भोसले इन्स्टिटयूटचा पदविका अभियांत्रिकी निकाल ९०%…

चार पैकी तीन विभागात मुली अव्वल..

⚡सावंतवाडी ता.०१-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९० टक्के लागला आहे. कॉलेजच्या चार पैकी तीन विभागात मुलींनी अव्वल स्थान पटकावले असून एका विभागात मुलाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे._

तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा निकाल ९५ टक्के लागला असून लीना चव्हाण हिने ९४.८६ टक्के गुणांसह प्रथम, पूजा सरमळकर हिने ९१.५४ टक्के गुणांसह द्वितीय तर आर्या परब हिने ८९.५४ गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय वर्ष सिव्हिल विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून स्टेला डांटस हिने ८६.४७ गुणांसह प्रथम, प्रज्योत दळवी याने ८६.४२ टक्के गुणांसह द्वितीय तर केशव बर्डे याने ८५.२६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल ९० टक्के लागला असून प्रतीक झारापकर याने ९०.५६ टक्के गुणांसह प्रथम, अथर्वा परब हिने ८७.७८ गुणांसह द्वितीय तर सायली गिरी हिने ८७.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाचा निकाल ७८ टक्के लागला असून पूजा कोकरे हिने ८८.६७ टक्के गुणांसह प्रथम, सुयोग देसाई याने ८५.८६ गुणांसह द्वितीय तर संतोष शर्मा याने ८४.९९ गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page