सावंतवाडी : माजगांव ग्रामपंचायतीचे उबाठा पक्षाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान
ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर सावंत, ग्रा.प. सदस्य सौ. पुजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर, माजगांव विभागप्रमुख उमेश गावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथील कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खारभूमी-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उबाठा पक्षाचे महिला आघाडी प्रमुख श्रीम. रश्मी पावसकर, सौ. ममता दळवी, नंदा भोगण, राजश्री तळवडेकर, सौ. सपना पेडणेकर, पदाधिकारी श्री. मनोहर दळवी, श्री. लवित सावंत, श्री. संतोष मयेकर, श्री. लवू चव्हाण, संदिप गावडे आदी असंख्य उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्याने सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या प्रवेशामुळे माजगांव गावात उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे