वेंगुर्ला शिंदे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला न. प. विषय समिती सभापती यांचे स्वागत…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष दिलिप गिरप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित विषय समिती सभापती – उपसभापती यांचे शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, अजित राऊळ, सत्यवान साटेलकर, शिवसेना नगरसेविका लीना म्हापणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा व जलनिस्साःरण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष विनायक उर्फ सुहास सदानंद गवंडळकर, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी प्रणव बाबली वायंगणकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी गौरी गणेश माईणकर, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी सचिन भगवान शेट्ये, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी गौरी सुदेश मराठे व उपसभापतीपदी रिया वासुदेव केरकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच सर्व समिती सदस्य यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती हे पदसिद्ध नगराध्यक्ष राहणार असून पाचही समित्यांचे सभापती हे या समितीचे सदस्य राहणार आहेत.
या बैठकीला
नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर, तसेच नगरसेवक लीना म्हापणकर, रविंद्र शिरसाट, प्रितम सावंत, आकांक्षा परब, सुधीर पालयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, विनय नेरुरकर, सदानंद गिरप, काजल कुबल, संदेश निकम, सुमन निकम, युवराज जाधव, समिधा रेडकर, शितल प्रभूआंगचेकर, प्रशांत आपटे व यशवंत उर्फ दाजी परब, सर्व नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तसेच प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील, सभा अधीक्षक स्नेहल शिंदे, सभा लिपिक कोमल पावसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page