आंबोली, ता. ०१: आंबोली ग्रामपंचायत कार्यालयात उद्या, २ जुलै रोजी, बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयाच्या अनघा कनयाळ यांनी केले आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना आधार कार्ड आणि बांधकाम कामगार म्हणून नोंदणीचे पुस्तक किंवा कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचेही कनयाळ यांनी स्पष्ट केले आहे. या शिबिरामुळे बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याची तपासणी करण्याची चांगली संधी मिळणार आहे.