⚡बांदा ता.३०-: रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या अध्यक्षपदी रोहन कुबडे तर सचिवपदी मिताली सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी दत्तराज चिंदरकर, खजिनदारपदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार दिनांक २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे.
कार्यकारिणीत संकेत वेंगुर्लेकर, अवधूत चिंदरकर, ईश्वरी कल्याणकर, अक्षय कोकाटे, नेहा निगुडकर, कविता बांदेकर, रुपाली देसाई, कल्याणदास धुरी, अमित धोंगडे, आयुष गवस, ओंकार पावसकर, शंकर कोकाटे, अजिंक्य पावसकर, विनिता कुबडे, निहाल गवंडी, मयूर मसुरकर, मनीषा खानगावकर, साईश मांजरेकर, साहिल बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला रोटरी व रोट्रॅक्टचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रोट्रॅक्ट क्लब बांदाचे मावळते अध्यक्ष अवधूत चिंदरकर यांनी केले आहे.
फोटो:-
रोहन कुबडे
मिताली सावंत
रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या अध्यक्षपदी रोहन कुबडे…!
