Headlines

शिक्षणमहर्षी रामभाऊ परुळेकर यांची जयंती साजरी…

⚡मालवण ता.०८-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी रामभाऊ विठ्ठल परुळेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी रामभाऊ परुळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य राबते यांनी परुळेकर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत देशाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे परुळेकर यांच्या जीवनकार्याचे प्रमुख सूत्र होते, असे सांगितले.

प्रा. स्नेहा बर्वे यांनी रामभाऊ परुळेकर यांच्या शिक्षण सचिव म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देत प्रौढ शिक्षण, साक्षरता प्रसार आणि समाजोपयोगी शैक्षणिक चळवळींना त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शिक्षणाचा व्यापक प्रसार झाला, असे सांगितले. तर प्रा. हसन खान यांनी रामभाऊ परुळेकर यांच्या शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संशोधन संस्थेमुळे शिक्षण व संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना नवी दिशा व सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अन्वेषा कदम यांनी केले, तर आभार प्रा. मिलन सामंत यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. पवार, प्रा. तावडे, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page