Headlines

कुडाळ कोरजाई बसफेरी पुन्हा सुरू…

प्रवाशांकडून समाधान व्यक्त:सौ रश्मी नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा..

⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ आगारातून अनेक वर्ष सुरू असलेली कुडाळ कोरजाई वस्तीची बसफेरी बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यासाठी सौ. रश्मी नाईक यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन पाठपुरावा केला.
कुडाळ कोरजाई वस्तीची बसफेरी बंद झाली होती, ती पुन्हा सुरू करण्यात यावी असे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचेमार्फत सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेवून निवेदन व चर्चा केली.
या भेटी वेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे आगाराचे कार्याध्यक्ष ऍड.राजीव कुडाळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत वालावालकर, महिला संघटक सौ.रेवती राणे, सचिव मिथुन बांबूळकर व कर्मचाऱ्यांचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडोलकर आदी उपस्थित होते.
सकाळी 9.00 वा कुडाळ आगारातून सुटणारी कवठी बसफेरी व दुपारी 2.10 वा सुटणारी कुडाळ कुशेवाडा मार्गे कोरजाई बसफे-या गेली अनेक वर्षे सुरू होत्या.पण अचानक सदर बसफे-या बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे सौ रश्मी नाईक यांचे नेतृत्वाखाली सदर बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कुडाळ आगारव्यवस्थापकांसोबत यशस्वी चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page