आडेली खुटवळवाडीतील वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त..
⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह सरपंच संघटनेने कुडाळ विद्युत वितरण कार्यालय येथे धडक देत वीज पुरवठा तसेच मेंटेनन्स ची कामे तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. याची तातडीने दखल घेत वेंगुर्ला वीज वितरण मार्फत वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी कडे जाणाऱ्या मार्गावरील विद्युत लाईनवरील झाडी कटिंग काम करण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी वायरमन श्री. सराफदार मठ भाजपा पदाधिकारी अजित नाईक, स्थानिक ग्रामस्थ, विद्युत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान तुटपुंजे काम न करता मुख्य मार्ग असल्याने उर्वरित कामही योग्यरित्या पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकातून करण्यात आली आहे. तसेच झाडी कटिंग करून साईडपट्टीवर व गटारात न टाकता त्वरित उचलण्यात यावी यावी, अशीही मागणी वाहधारकतून करण्यात आली आहे. दरम्यान आडेली खुटवडवाडी कार्यक्षेत्रात दोन दिवस खंडित वीजपुरवठा येथील वायरमन श्री. सराफदार यांच्यासह कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्यानंतर येथील वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी वीज वितरणबाबत समाधान व्यक्त केले आहे.
