Headlines

चराठा गावठणवाडीत घरावर माड कोसळला..

मायलेक थोडक्यात बचावले:दीड लाखांचे नुकसान..

⚡सावंतवाडी ता.०८-: चराठा गावठणवाडी येथील अरुण धोंडू परब यांच्या घरावर माड कोसळून घराच्या छपरासह आतील वस्तूंचे सुमारे १,४७,५०० रुपयांचे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी चिमुकल्यासह त्याची आई होती मात्र सुदैवानेच दुर्घटना टळली. हा माड कोसळताना मोठा आवाज आल्याने शेजारी धाऊन आले. मात्र कोणताही अनर्थ न घडल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

मात्र या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी घरात सौ दिप्ती अनिकेत परब आणि त्यांचा अडीच वर्षाचा कु. अर्श परब हा मुलगा होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून मायलेक बचावले. पूर्ण माडच घरावर कोसळल्यामुळे लोखंडी छप्पर नादुरुस्त झाले तर सिमेंटचे पत्रे फूटले. तसेच भिंतीना भेगा पडून भिंती कमकुवत बनल्या. तसेच एका खोलीत असलेल्या पेप्सी बनवण्याचे डीप फ्रीज आणि हर्डनर यांचा चक्काचूर झाला. नुकसानीचा पंचनामा तलाठी श्री आव्हाड यांनी केला. यावेळी माजी सरपंच बाळू वाळके, पोलिस पाटील सचिन परब, कोतवाल सुप्रिया परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page