Headlines

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील झाड कोसळले…

अनिल भिसे यांच्या स्टॉलचे नुकसान:मुसळधार पावसामुळे घटना; सुदैवाने जीवितहानी टळली.

⚡सावंतवाडी, ता. ८-:
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील अनिल भिसे यांच्या घरासमोर बुधवारी सकाळी अचानक झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत सौ. भिसे यांचा व्यावसायिक स्टॉलचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड अचानक उन्मळून पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. झाड थेट स्टॉलवर कोसळल्याने स्टॉलचे मोठे नुकसान झाले असून त्यातील साहित्याचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. संबंधित यंत्रणेकडून झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. परिसरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page