समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन…
⚡सावंतवाडी, ता.०८-:
प. पू. श्री सद्गुरू मियांसाब यांच्या ८९ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी योगिनी एकादशीच्या पावन दिवशी समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते १० या वेळेत श्री सद्गुरू पूजन, सकाळी १० ते दुपारी १२ श्रींची प्रार्थना व नामस्मरण, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी नामस्मरण व कीर्तन, सायंकाळी ज्ञानेश्वरी व श्री एकनाथ भागवत वाचन, तसेच रात्री श्रींचे भजन, हरिपाठ आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सर्व भाविकांनी या पुण्यतिथी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष वसंत गावडे-राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, खजिनदार शैलेश पै, प्रसाद अरविंदेकर आणि सचिव उमेश कोरगावकर यांनी केले आहे.
