⚡कुडाळ ता.०८-: १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नव्या आयकर कायद्यात करण्यात आलेल्या व्यापक बदलांची माहिती करदात्यांपर्यंत पोहोचावी आणि आर्थिक नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय आयकर विभाग, दिल्ली तसेच प्रमुख आयकर आयुक्त, पुणे यांच्या सूचनेनुसार ‘ प्रारंभ 2026’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन ९ जूलै रोजी सकाळी ११.३० वा कुडाळ येथील हॉटेल लाईम लाईट सभागृहात करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती कोल्हापूर येथील आयकर विभागाचे जॉइंट कमिशनर डॉ. मिलिंद देबजे, सहाय्यक आयुक्त डॉ. जगदीश जगताप आणि आयकर अधिकारी श्री. अजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या सत्रात नव्या आयकर कायद्याची सविस्तर माहिती पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करदात्यांनी व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार यांनी या विशेष मार्गदर्शन सत्राला उपस्थित राहून नव्या आयकर कायद्याविषयी माहिती करून घ्यावी, असे आवाहन आयकर अधिकारी, सिंधुदुर्ग अजय पवार यांनी केले आहे.
नव्या आयकर कायद्याविषयी उद्या कुडाळात मार्गदर्शन सत्र…
