आंबोलीत पोलिसांची मोठी कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त…

⚡आंबोली ता.१४-: काल रात्री साडेनऊ वाजता आंबोली पोलिस चेकपोस्टवर वाहने तपासणीदरम्यान इनोव्हा कार क्रमांक MH 02 BD 2917 ही सावंतवाडीहून कोल्हापूरकडे जात असताना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी न थांबवता पळ काढल्याने पोलिसांनी चौकुळ रस्त्यावर सरकारी वाहनातून पाठलाग केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता अडवून इनोव्हा वाहन थांबवण्यात आले.तपासणी दरम्यान वाहनातून गोवा बनावटीची विविध ब्रँडची 20 बॉक्स दारू मिळाली, ज्याची किंमत एक लाख दोन हजार रुपये आहे. संबंधित वाहनाची किंमत पाच लाख रुपये असून वाहन व दारू असा एकूण सहा लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात वाहनचालक सतीश भीमराव आर्दळकर (वय 37, रा. अडकूर, ता. चंदगड, कोल्हापूर) आणि अविनाश दशरथ पाटील (वय 32, रा. बोंदुर्दी, ता. चंदगड, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली असून पंचनामा करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकातील हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे व गौरव परब यांनी केली.

You cannot copy content of this page