Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार विलास गावडे यांच्याकडे…

⚡सावंतवाडी, ता. १२-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. इर्शाद शेख हे आजारपणामुळे औषधोपचारासाठी बाहेर जात असल्याने वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विलास गावडे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. गणेश पाटील यांनी जारी केले असून,…

Read Full News

वसंत गावकर यांची शिवसेना मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती…!

⚡मालवण ता.१२-:मालवण शहरातील धुरीवाडा येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते वसंत देवेंद्र गावकर यांची शिवसेनेच्या मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही निवड जाहीर केली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वसंत गावकर यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. वसंत गावकर यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

Read Full News

पाऊस थांबूनही खड्डे बुजवण्यासाठी अजून कोणाची वाट पाहत आहात…?

रवी जाधव:नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष द्यावे.. ⚡सावंतवाडी, ता. १२-: गणेश चतुर्थीचा उत्सव संपून आता दिवाळीही जवळ आली असली, तरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे यथावत आहेत. त्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. पावसाळा संपल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन नगरपरिषदेने लेखी पत्राद्वारे दिले होते. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नसल्याने…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि उबाठा मालवण उपतालुका प्रमुख बाळ महाभोज यांच्यासह गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. आमदार निलेश राणे यांनी गेल्या दहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावला आहे….

Read Full News

घारपी शाळेत विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले वितरण…

⚡बांदा ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सावंतवाडी तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद घारपी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखल्यांचे वितरण करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या दाखले वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक जे.डी.पाटील,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा यशोदा गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे,संतोष कविटकर, अजित…

Read Full News

गंजिफा कलेचा इतिहास देश आणि परदेशात प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल-:खेमसावंत भोसले…

⚡सावंतवाडी ता.१२-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हणून गौरविलेल्या सावंतवाडी संस्थानच्या गंजिफा कलेला भारतीय पोस्टाच्या तिकिटावर सन्मान मिळाल्यामुळे सावंतवाडी संस्थानसह गंजिफा कलेचा इतिहास देश आणि परदेशात प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केला. सावंतवाडी संस्थानच्या गंजिफा कलेला विशेष पोस्ट तिकिटावर स्थान देत भारतीय टपाल विभागाने…

Read Full News

समाजात व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची गरज…

पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी:रेडी यशवंतगड किल्ल्यावरून “व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा” शानदार शुभारंभ.. ⚡वेंगुर्ला ता.११-: सध्याचे गुन्हे घडतात ते व्यसनामधून घडतात. त्यासाठी समाजातून व्यसन मुक्ती होणे आज गरजेचे आहे. व्यसन मुक्ती साठी मनाचा निश्चय महत्वाचा आहे. व्यसनामुळे माणसाचे आयुष्य उध्वस्त होतेच त्याचबरोबर त्यांचा संसारही उध्वस्त होतो. म्हणूनच समाजात असे व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची…

Read Full News

दीपावली निमित्त आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१२-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी या संस्थेकडून चौदा वर्षाखालील मुलांसाठीच बांदा शहर मर्यादित पर्यावरण पुरक साहीत्य वापरून स्वतः तयार केलेल्या आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आपली नोंदणी गुरुनाथ नार्वेकर, सुभाष नाईक, महादेव वसकर, जगन्नाथ सातोसकर यांचेकडे करावी. प्रथम तीन क्रमांकाच्या आकाश कंदिलांना अनुक्रमे 1000/-,₹ 800/-₹,500/-…

Read Full News

१५ वर्षात २९०० कार्यक्रम ; नृत्यांगना मृणाल सावंतचा गौरव…

वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी तर्फे सत्कार… ⚡कुडाळ ता.१२-: आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कलाही जोपासली पाहिजे कलेतून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो असे प्रतिपादन कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने केले . गेल्या १५ वर्षात २९००कार्यक्रमाचा टप्पा पार केल्याबद्दल तिचा गौरवपर सत्कार करण्यात आला    वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी…

Read Full News

भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि पर्यावरण अभ्यासक बसवंत बाबाराव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद…

⚡मालवण ता.११-:वनराई संस्था, पुणे व एच. डी. एफ. सी. बँक यांच्या संयुक्त ‘परिवर्तन’ प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍यात प्रसिद्ध भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि वनराईचे पर्यावरण अभ्यासक श्री. बसवंत विठाबाई बाबाराव यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत भूविज्ञान, सागर आणि पर्यावरण संवर्धनाविषयीची आवड जागवली. या शैक्षणिक स्थळ भेटीत भूवैज्ञानिक डॉ. अजित…

Read Full News

You cannot copy content of this page