Headlines

लिनेसच्या नुतन पदाधिका-यांना शपथ प्रदान…

⚡वेंगुर्ला ता.११-: लिनेस क्लबच्या सिधुदुर्ग अध्यक्ष छाया ठक्कर आणि माजी अध्यक्ष नलिनी पारेख, प्रभाग समन्वयक उर्मिला सावंत, जिल्हा सेक्रेटरी पद्मजा वाड यांनी वेंगुर्ला येथील लिनेस क्लबला भेट देत आढावा घेतला.शहरातील भाटीया हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मोना नाईक, श्वेता आरोसकर, राखी दाभोलकर, राधिका सकपाळ, मनाली कामत या नुतन पदाधिका-यांना नलिनी पारेख यांनी शपथ प्रदान केली….

Read Full News

कुडाळ पंचायत समितीची सदस्य आरक्षण सोडत सोमवारी…

कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तहसिलदार कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया सार्वजनिक उपस्थितीत व पारदर्शक पद्धतीने पार…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय साधनांचे लोकार्पण…

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश.. कणकवली : केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रम शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला तब्बल ४५ लाख रुपयांची अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. यासाठी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या पुढाकारातून पाठपुरावा करण्यात आला होता. या उपकरणांमध्ये सी-आर्म मशीन, लॅप्रोस्कोपिक…

Read Full News

त्या १० डॉक्टरांना आम्ही थांबवण्याची विनंती केली…

अनारोजीन लोबो: विरोधक नाव बदनाम करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत.. सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातून १० डॉक्टर सोडून जाणं परवडणारं नाही. त्यांना थांबण्याची विनंती आम्ही केली आहे. शिवसेना त्यांच्यासह आहे, त्यांनी राजीनामे देऊ नये, असे आवाहन माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी केले. तसेच सावंतवाडीच्या हॉस्पिटलच नाव बदनाम करुन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न काही जण करत…

Read Full News

आमच्यासारखी वेळ अन्य पर्यटकांवर येऊ नये याची दक्षता घ्या

वेळागर दुर्घटनेत स्थानिकांनी सहकार्य केले पण प्रशासनाची साथ नाही:मणियार कुटुंबायांनी व्यक्त केली खंत.. ⚡कुडाळ ता.११-: गेल्या शुक्रवारी शिरोडा-वेळागर दुर्घटनेत आमच्या कुटुंबातील सात सदस्यांना आम्ही गमावून बसलो, हे दुःख मोठे आहेच. पण आमच्यासारखे आभाळाएवढे दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी शासन, प्रशासन, पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील धोकादायक समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्ड, माहिती फलक, वगैरे सारखी यंत्रणा उभारावी…

Read Full News

पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम जागरूकता…

कुडाळ : पाट हायस्कूलच्या अकरावी मधील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन फ्रॉड .सायबर क्राईम. विषयक माहिती देण्यात आली. सावधानता म्हणून पासवर्ड, ओटीपी, बँक खाते, वैयक्तिक माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस श्रीमती धनश्री परब यांनी सविस्तर माहिती दिली, तर मार्गदर्शक म्हणून सागर भोसले, निकिता परब, अभिषेक गायकवाड उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर उपस्थित होते….

Read Full News

पाट हायस्कूल मध्ये वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध उपक्रम…

⚡कुडाळ ता.११-: राज्यभर वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वनविभाग सिंधुदुर्गच्या वतीने पाट हायस्कूल मध्ये सर्पा विषयक समज गैरसमज या विषयावर प्रात्याक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.सापांचे विविध प्रकार विषारी बिनविषारी सापाची ओळख त्यावरील वैद्यकिय उपाय आणि प्राथमिक उपचार या विषयी जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा वन अधिकारी मगदुम…

Read Full News

कॅन्सरग्रस्त विनीत किनवडेकर यास २५ हजारांची आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.११-: म्हापण चव्हाणवाडीचे रहिवासी श्री शैलेश विष्णू किनवडेकर यांचे चिरंजीव कु. विनीत शैलेश किनवडेकर (वय १८) गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत असून, सध्या त्याच्यावर कोल्हापूर येथील ॲपल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.त्याच्या उपचारासाठी अॅड. गणेश प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकारातून माननीय श्री विशालजी परब (उद्योजक तथा युवा नेता, भाजपा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) आणि अॅड….

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक हालचाली…

देव्या सूर्याजी: रुग्णालय कर्मचारी व रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.. सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यांबाबत अभिनव फाउंडेशनने १० वर्षांपूर्वी याचिका दाखल केली असून कोल्हापूर खंडपीठात ती सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तथ्य शोधक समिती गठीत करून आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. तसेच आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह देखील भेट…

Read Full News

आंबोलीत मुख्याध्यापकाची आत्महत्या…

आंबोली,ता.११: येथील गावठण वाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असणारे आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी आपल्या राहत्या घरी गेळे कदम वाडी येथे रात्री साडे नऊ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री कामावरून घरी गेलेल्या भावाने खिडकीतून बघितली दरवाजाला आतून कडी घालून गळफास अवस्तेत असल्याचे त्याने आंबोली पोलीस स्थानकात कळवले.यांनतर आंबोली पोलीस स्थानका…

Read Full News

You cannot copy content of this page