कुडाळ पंचायत समितीची सदस्य आरक्षण सोडत सोमवारी…

कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तहसिलदार कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.
कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया सार्वजनिक उपस्थितीत व पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.सदर सोडतीसाठी संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांनी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तहसिलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page