Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती एस. टी. सावंत यांचे निधन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत (काका) यांचे आज, रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

एस. टी. सावंत यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले होते. तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ते सक्रियपणे कार्यरत होते. त्यांची अंत्ययात्रा आज, रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यानंतर जाणवली येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

You cannot copy content of this page