कॅन्सरग्रस्त विनीत किनवडेकर यास २५ हजारांची आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.११-: म्हापण चव्हाणवाडीचे रहिवासी श्री शैलेश विष्णू किनवडेकर यांचे चिरंजीव कु. विनीत शैलेश किनवडेकर (वय १८) गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत असून, सध्या त्याच्यावर कोल्हापूर येथील ॲपल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.त्याच्या उपचारासाठी अॅड. गणेश प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकारातून माननीय श्री विशालजी परब (उद्योजक तथा युवा नेता, भाजपा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) आणि अॅड. श्री अनिल निरवडेकर यांनी मिळून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

ही रक्कम श्री शैलेश किनवडेकर यांना सुपूर्त करण्यात आली. यावेळी श्री प्रशांत चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, महेश चव्हाण, दादु म्हापणकर, सागर चव्हाण आणि सर्वेश चव्हाण उपस्थित होते.विनीतच्या उपचारार्थ दिलेल्या या मदतीबद्दल माननीय श्री विशालजी परब आणि अॅड. अनिलजी निरवडेकर यांचे कुटुंबीयांनी व गावकरी बांधवांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page