दीपावली निमित्त आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१२-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी या संस्थेकडून चौदा वर्षाखालील मुलांसाठीच बांदा शहर मर्यादित पर्यावरण पुरक साहीत्य वापरून स्वतः तयार केलेल्या आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आपली नोंदणी गुरुनाथ नार्वेकर, सुभाष नाईक, महादेव वसकर, जगन्नाथ सातोसकर यांचेकडे करावी. प्रथम तीन क्रमांकाच्या आकाश कंदिलांना अनुक्रमे 1000/-,₹ 800/-₹,500/- स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री प्रकाश पाणदरे हे या स्पर्धेचे प्रायोजक असून स्पर्धेचे परीक्षण दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करून दीपावलीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page