⚡सावंतवाडी ता.१२-: गेल्या काही दिवसांपासून वेत्ये गावातील छोट्या होळामध्ये फेरफटका मारणारी मगर अखेर आज ग्रामस्थ आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून पकडण्यात आली. या घटनेमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावातील नागरिकांना होळ्याजवळ मगर वावरण्याचे लक्षात आले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी त्वरित वनविभागाला माहिती दिली. आज सकाळी पुन्हा मगर दिसून आल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने शिताफीने ती मगर पकडण्यात यश मिळवले.ही कारवाई जवळपास दोन तास चालली. पकडलेली मगर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
दरम्यान, मगर पकडली गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण आहे.
