राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कोकणाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान कणकवली कामगार कल्याण संघाला…

महाड द्वितीय तर पोफळी तृतीय; वैयक्तिक बक्षीसातही कणकवलीचे वर्चस्व..

कणकवली : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभाग गट कार्यालय चिपळूण आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त कामगार कल्याण केंद्र कणकवली मार्फत नगर वाचनालय हॉल कणकवली येथे गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेता ठरला कामगार कल्याण कणकवली हा संघ .या संघाला जानेवारी मध्ये हुतात्मा दिनानिमित्त रंगणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा मान कोकण गटातून मिळाला. द्वितीय परितोषिक कामगार कल्याण केंद्र महाड तर तृतीय परितोषिक कामगार कल्याण केंद्र पोफळी संघाने पटकावले.
कामगार कल्याण केंद्र कणकवली तर्फे उतरलेला शेतकरी खरेदी विक्री संघास मंडळाच्या राज्य स्तरीय भजन सर्धेत कोकणाचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाला. मान्यवर परिक्षक शाहिर प्रा.हरिभाऊ भिसे, मोहन मेस्त्री व तेजस्वीता पेंडुरकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रथम कणकवली संघाने सादरीकरण केले. चिपळूण, खेर्डी वसाहत, पोफळी, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पिंगुळीवसाहत कुडाळ, महाड, मालवण व महावितरण अशा एकूण अकरा संघानी सादरीकरण केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ह भ प मा श्री विश्वनाथ गवंडळकर अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख पाहूणे सचिन राऊत प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता व युवराज महालिंगे प्राचार्य कणकवली कॉलेज सुवर्णा दळवी शिंदे विभागीय लेखाधिकारी तथा कामगार अधिकारी राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग यांच्या शुभहस्ते पार पडला. स्पर्धेचे परीक्षण परिसरातील संगीततज्ञ प्रा शाहीर हरीभाऊ भिसे मोहन मेस्त्री व तेजस्विता तेंडूलकर यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत राजेंद्र निकम प्रभारी कामगार कल्याण अधिकारी कार्यक्षेत्र रायगड रत्नागीरी व सिंधुदुर्ग यांनी केले तर निवेदन संतोष नेवरेकर केंद्रसंचालक कणकवली यांनी केले.
वैयक्तिक बक्षिसे:
वैयक्तीक बक्षिसामध्ये उत्कृष्ट तालसंचन प्रथम मालवण, व्दितिय कणकवली व तृतिय महावितरण; सर्वोत्कृष्ट हार्मोनियम प्रथम सचिन शेमडकर कुडाळ, व्दितिय सुजित परब कणकवली, तृतिय सौरभ पालकर महाड; सर्वोत्कृष्ट गायिका प्रथम अनिकेत चव्हाण पोफळी, व्दितिय सुजित परब कणकवली, तृतिय सौरभ पालकर महाड; सर्वोत्कृष्ट तबला व पखवाज वादक प्रथम तुषार लोट कणकवली, व्दितिय माधव मेस्त्री पोफळी व तृतिय रोशन चौधरी महाड यांनी पटकावली.
कार्यक्रमाचे नियोजन सर्व केंद्रप्रमुख दिपक गायकवाड महाड, नम्रता आराबेकर सावंतवाडी, सुष्मिता नाईक कुडाळ, पूजा नागवेकर रत्नागीरी व संगीता सुवार पोफळी यांनी श्र्वेता नाईक आरोसकर, नंदीनी मांजरेकर, सविता देऊळकर, दत्ताराम तळावडेकर यांच्या सहकार्याने केले.
*(फोटो-11-कणकवली ,महाड,पोफळी)राज्य स्तरीय भजन सर्धेत प्रथम विजेता ठरलेला कामगार कल्याण कणकवली संघ, द्वितीय विजेता महाड संघ व , तृतीय पोफळी,

You cannot copy content of this page