Headlines

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत ‘मेक ईन कोकण’ उद्योग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.१९-:मेक ईन कोकण’ उपक्रमांतर्गत “उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५” या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सावंतवाडीत मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ‘पद्मश्री’ मा. परशुराम गंगावणे यांच्या शुभहस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पदाधिकारी, स्थानिक उद्योजक, बचतगट सदस्य…

Read Full News

गंभीर आजाराने त्रस्त बालिकेसाठी मातृत्व आधार फाऊंडेशनकडून मदतीचा हात…

⚡मालवण ता.१८-:मालवण राजकोट येथील रहिवासी श्री. निलेश किशोर चिंदरकर यांची २ वर्षीय मुलगी वैष्णवी चिंदरकर ही ब्रेन ट्युमर या गंभीर आजाराने त्रस्त असून तीच्या उपचारासाठी मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या मार्फत दात्याच्या सहकार्याने चिंदरकर कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. वैष्णवी चिंदरकर ही दोन वर्षीय बालिका ब्रेन ट्यूमर आजाराने त्रस्त असून तिच्यावर…

Read Full News

‘श्री राम वाचन मंदिर’च्या दिवाळी अंक प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ…

१०० दिवसांत १०० दिवाळी अंक वाचण्याची खास योजना.. ​सावंतवाडी । प्रतिनिधी : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘श्री राम वाचन मंदिर, सावंतवाडी’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी अंक प्रदर्शन आणि वाचक योजने’ चा शुभारंभ आज शनिवारी सायंकाळी ग्रंथालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आणि संघाचे सहसचिव विनायक गावस…

Read Full News

मालवण लायन्स क्लबने फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांसोबत साजरी केली दिवाळी…

मालवण ता.१९-: लायन्स क्लब मालवणच्या वतीने लायन्स सदस्या सौ. अंजली आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुलांना दिवाळीचे उटणे, मोती साबण, तेल बाटली, मिठाई व चॉकलेट्स, पौष्टिक खाऊ, फराळ आणि दैनंदिन जीवनाश्यक वस्तू व अन्नधान्य यांचे वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी मुलांसोबत फुलबाजा व…

Read Full News

मडुरा येथील विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती…

बांदा/प्रतिनिधीमडुरा येथील व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून विदयार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढून दिव्यांची सजावट करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे सांस्कृतिक महत्व समजावून सांगितले.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे तयार केली. ही शुभेच्छा पत्रे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. पत्राचा प्रवास समजवण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती…

Read Full News

ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी निरूखे येथे मसाला प्रशिक्षण कार्यशाळा,28 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग…

⚡बांदा ता.१८-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत निरूखे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मसाले बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेने ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी नवा मार्ग खुला केला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तब्बल 28 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोकण कला व…

Read Full News

बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी साकारली दिवाळीची झगमग…

आकाशकंदील व सजावटी साहित्य प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡बांदा ता.१८-: पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्र. १ येथे दीपावली सणाचे औचित्य साधून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील, पणत्या, उटणे आणि विविध सजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. याला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद…

Read Full News

आसोली शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१८-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आसोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आसोली क्रमांक एक प्राथमिक शाळा व आसोली हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिराचे उद्घाटन आसोली सरपंच बाळा जाधव, ग्रामविस्तार अधिकारी दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य शितल घाडी-जाधव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रायकर, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ….

Read Full News

कौशल्य शिक्षणातून दिवाळी साजरी,विद्यार्थ्यांचा सर्जनशील उपक्रम…

बांदा / प्रतिनिधी:येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सन २००८ पासून एम.एस.ए.टी (M.S.A.T) विभागामार्फत इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण दिले जाते. या विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व कौशल्यविकासक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने एम.एस.ए.टी विभागामार्फत विद्यार्थ्यांनी उटणे आणि मेणबत्त्या स्वतः तयार केल्या. या वस्तूंची बांदा परिसरात तसेच शाळेत लोकोपयोगी सेवेअंतर्गत…

Read Full News

खेमराज मेमोरियल स्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक दिनकर कल्याणकर यांचे निधन…

⚡बांदा ता.१८-: येथील खेमराज मेमोरियल प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक दिनकर वामन कल्याणकर (वय ८४) यांचे शुक्रवारी रात्री उशिरा राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेत. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे….

Read Full News

You cannot copy content of this page