बांदा/प्रतिनिधी
मडुरा येथील व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून विदयार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढून दिव्यांची सजावट करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे सांस्कृतिक महत्व समजावून सांगितले.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे तयार केली. ही शुभेच्छा पत्रे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. पत्राचा प्रवास समजवण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भाऊ वळंजू व शशी पित्रे यांजकडून सर्वांना उटणे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका वेलांकनी रोड्रीस, मयुरी कासार, स्वरा राठवड, हर्षदा तळवणेकर आदी उपस्थित होत्या.
फोटो:-
मडुरा येथे विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनविले.
मडुरा येथील विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती…
