Headlines

पणजी, गोवा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याचा बावीसावा क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.२१-: तिसवाडी बुदधिबळ असोसिएशनने पणजी, गोवा येथे आयोजित केलेल्या एक लाख रुपये पारितोषिके असलेल्या राष्ट्रीय ब्लिट्ज रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने उत्कृष्ट खेळ केला. या स्पर्धेत बाळकृष्णने बावीसावा क्रमांक मिळवला. एक ग्रँडमास्टर आणि चार इंटरनॅशनल मास्टर्ससोबत भारतातील जवळपास दोनशे खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.
बाळकृष्णला स्पर्धेत ग्रँडमास्टर राॅय सप्तर्षी चौधरी यांच्याविरुदध टाॅप टेबलवर खेळण्याची संधी मिळाली. बाळकृष्णने अकरा राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि तीन राऊंड्स बरोबरीत सोडवून साडेसात गुण केले आणि बावीसावा क्रमांक पटकावला. त्याने आपले रेटिंग पाॅईंट्स वाढवले. बाळकृष्णला रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पुष्कर केळूसकर याने तब्बल सहा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवून सहा गुण केले आणि ब्लिट्ज रेटिंग मिळवले. अथर्व वेंगुर्लेकर यांने सहा गुण, हर्ष राऊळ याने साडेपाच गुण आणि चिदानंद रेडकर याने पाच गुण केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि सचिव सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page