कुडाळ : तालुक्यातील तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून दर्शन व ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, केळी नारळ ठेवणे, सायंकाळी पाषाणे सजविणे, तरंगरुप देवतांना वस्त्रालंकार अर्पण करून देवतांना श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घालणे, रात्री 8 वाजता टिपर (पणत्या) लावणे, 9 वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री 11 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक, तर दुसऱ्यादिवशी सकाळी दहिकाला होऊन सांगता होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती (तेंडोली) व ग्रामस्थांनी केले आहे.

