Headlines

चेंदवणच्या पाताळेश्वराची आज ‘गाडग्याची जत्रा’

कुडाळ : तालुक्यातील चेंदवण येथील देव पाताळेश्वरची ‘गाडग्याची जत्रा’ (वार्षिक जत्रोत्सव) २१ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आवळेगावच्या नारायणाच्या जत्रोत्सवसोबतच ही सुद्धा जिल्ह्यातील पहिली जत्रा मानली जाते.
२१ रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, दुपारी १२.३० वाजता नैवेद्य व आरती, सायंकाळी ५ वाजता श्री देव पाताळेश्वर महाराजांची पालखी, श्री देवी माऊली मंदिर येथे श्री देवी माऊलीच्या भेटीस येईल व देवी माऊली मंदिर येथे तुळशी विवाह, ६ वाजता श्री देव पाताळेश्वराच्या पालखीचे वाजत-गाजत श्री देव पाताळेश्वर मंदिर येथे प्रस्थान व तुळशी विवाह, रात्री १० वाजता जागर व आरती, ११ वाजता श्री देव पाताळेश्वराच्या पालखीची ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, १ वाजता चेंदवणकर दशावतार मंडळ (चेंदवण) यांचे
नाटक, दुसऱ्यादिवशी पहाटे ५.३० वाजता देव पाताळेश्वर मंदिरात काकड आरती, राधाकृष्ण रुपात गाडगे फोडणे कार्यक्रम व नंतर देव पाताळेश्वराचा पदस्पर्श लाभलेले श्रीफळ (नारळ) दशावतार पेटाऱ्यात ठेवून मानकरी व ईर्तिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाव गाऱ्हाणे होऊन जत्रोत्सवाची सांगता होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी माऊली, श्री देव पाताळेश्वर आदी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती (चेंदवण) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page