मालवण दि प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सेवा दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विलास ओताडे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सेवा दल काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री पेवेकर यांच्या हस्ते शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी मालवण-तारकर्ली, वायरी भूतनाथ येथील निवासस्थानी आयोजित सेवा दल काँग्रेसच्या कार्यक्रमात श्री. तळवडेकर यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव साईनाथ चव्हाण, ओबीसी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश अंधारी, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोडक, जेम्स फर्नांडिस, प्रमोद मोहिते, चंदन पांगें, विष्णू कोरगांवकर, ओटवणेकर, सुकि, सुरेश वस्त, सुधीर हळदणकर, भाई चव्हाण, महेंद्र करंगुटकर, बी. ए. गावकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, बाबल म्हापसेकर, बाळा घाडसकर, संदिप सुकी यांच्यासह सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी आणि मालवण येथील काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि शालेय मुलांच्या भेटवस्तू देऊन सेवा दल काँग्रेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस सेवा दलाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
