मालवण दि प्रतिनिधी

क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आयोजनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला. या महोत्सवात वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थिनी कु. रुचिता चंद्रशेखर वराडकर हिने चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
नशा मुक्त युवा आणि विकसित भारत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेत रुचिताने व्यसनाचे दुष्परिणाम प्रभावीपणे दर्शविणारे चित्र रेखाटले. तिच्या कलाकृतीतून व्यसनमुक्त युवा पिढी आणि विकसित भारताचा संदेश देण्यात आला. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मार्क धर्माई यांच्या हस्ते रुचिताला सन्मानित करण्यात आले. कुमारी रुचिताला प्रशालेचे कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल श्री. शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, उपाध्यक्ष श्री. आनंद वराडकर व श्री. शेखर पेणकर, सचिव श्री. सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव श्री. साबाजी गावडे, खजिनदार श्री. रविंद्रनाथ पावसकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर, तसेच सर्व संचालक व संचालिका, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे आणि पर्यवेक्षक श्री. महेश भाट यांनी रुचिताचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
