मालवण दि प्रतिनिधी

आचरा किनारपट्टीवरील समुद्रधूप आणि उधाणाच्या लाटांमुळे निर्माण होणारा धोका कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आचरा पिरावाडी आणि आचरा हिर्लेवाडी येथे समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या दोन महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्ही कामांसाठी एकूण १४ कोटी १३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यामुळे आचरा किनारपट्टीच्या संरक्षणाला मोठे बळ मिळणार आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांचा शुभारंभ आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला
आचरा पिरावाडी येथे समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ५ कोटी ३३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या बंधाऱ्याची लांबी ४२५ मीटर असणार आहे. तर आचरा हिर्लेवाडी येथे समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी ८ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या बंधाऱ्याची लांबी ७३० मीटर असणार आहे. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी समुद्रधूप प्रतिबंधक बंधारे उभारण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य चावलं मुजावर, गणेश तोंडवळकर, वर्षा सांबारी, महेश राणे, संतोष कोदे, अनिल करंजे, पूर्वा तारी, श्रीकांत पराडकर, जितेंद्र धुरी, फिरोज मुजावर, अबू मुजावर, अजय कोयंडे, जग्गू जोशी, आबा मुणगेकर, राजू मुजावर, किशोर तळवडकर अभय भोसले, योगेश गावकर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंदू कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
आचरा पारवाडी नदीपात्रातील गाळ उपशा कामाचा शुभारंभ निलेश राणे याच्या उपस्थितीत
आचरा खाडीत साचलेल्या गाळाचा फटका या भागातील नागरिकांना बसत होता.या मुळे पावसाळ्यात किनारपट्टी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात खारे पाणी जाऊन शेतीचे नुकसान होणे,उन्हाळ्यात पात्रात पाणी साठवण क्षमतेवर परुणाम आदी बाबींवर परीणाम होत होता. याबाबत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून याला निधी उपलब्ध झाल्याने या कामाचा शुभारंभही आमदार राणे यांच्या उपस्थितीत पारवाडी नदी किनारी करण्यात आला.यावेळी मान्यवरांसह पारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
