Headlines

कोळंब येथे अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडले

भल्या पहाटे महसूल विभागाची कारवाई

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरु असून यावर महसूल विभागाने शनिवारी भल्या पहाटे धडक कारवाई केली आहे. कोळंब खडवण नाका येथे शनिवारी पहाटे ३. ३० वाजण्याच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत.

या कारवाईत GA- 04 -T -3851, GA- 04- T -3147 या क्रमांकाचे गोवा पासिंगचे दोन डंपर आणि सिंधुदुर्ग पासिंगचा MH – 07 -AQ- 8118 या क्रमांकाचा एक डंपर असे तीन डंपर पकडण्यात आले. या तिन्ही डंपर मध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू सापडून आली. अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी हे डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत. मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंगरे, कोळंब मंडळ अधिकारी श्रीम. मिनल चव्हाण, आचरा मंडळ अधिकारी उमेश सिंगनाथ, सुकळवाड मंडळ अधिकारी श्रीम. स्वप्नात जंगले, ग्राम महसूल अधिकारी श्री. खुलपे, श्री गुरव, महसूल सेवक सत्यवान पाताडे, वैभव मसुडगे, संतोष चव्हाण आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page