मालवण लायन्स क्लबने फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांसोबत साजरी केली दिवाळी…

मालवण ता.१९-: लायन्स क्लब मालवणच्या वतीने लायन्स सदस्या सौ. अंजली आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुलांना दिवाळीचे उटणे, मोती साबण, तेल बाटली, मिठाई व चॉकलेट्स, पौष्टिक खाऊ, फराळ आणि दैनंदिन जीवनाश्यक वस्तू व अन्नधान्य यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी मुलांसोबत फुलबाजा व पाऊस फटाके लावून दिवाळी साजरी केली. यावेळी लायन्स क्लब अध्यक्षा अनुष्का चव्हाण यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत मुलांना इच्छीत ध्येय गाठण्यासाठी व आपल्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे, असे सांगितले. यावेळी अनुष्का चव्हाण यांच्यासह सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, जयश्री हडकर, नंदिनी गावकर, अंजली आचरेकर, ऋग्वेदा धमापूरकर, प्रज्ञा तयाशेटे, सोनाली पाटकर, विराज आचरेकर, उमेश शिरोडकर, काव्या आचरेकर, कनिका धामापूरकर, आश्विक धामापूरकर, राहील तायशेटे, सिस्टर अनिता आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page