⚡बांदा ता.१८-: येथील खेमराज मेमोरियल प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक दिनकर वामन कल्याणकर (वय ८४) यांचे शुक्रवारी रात्री उशिरा राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेत. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बांद्याचे माजी पाहिले लोकनियुक्त सरपंच तथा बांधकाम व्यावसायिक मंदार कल्याणकर आणि कापड व्यापारी समीर कल्याणकर यांचे ते वडील होत.
फोटो:-
पासपोर्ट
खेमराज मेमोरियल स्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक दिनकर कल्याणकर यांचे निधन…
