Headlines

उबाठाला धक्का,कलंबिस्त गावातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡सावंतवाडी,ता.१९-: भारतीय जनता पार्टीचा प्रभाव देशभरात वाढत असताना, कोकणातही नव्या उत्साहाने पक्षविस्ताराला चालना मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते विशाल परब यांच्या प्रयत्नांतून सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावात उबाठा पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश झाला आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

Read Full News

कणकवलीच्या दिक्षा चव्हाणला कॅरममध्ये राज्य स्तरीय रौप्य पदक…

दीक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या संघात निवड.. कुडाळ : एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे दि. १४- १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ५९ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी, कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमला कडवी लढत दिली पण तिला…

Read Full News

ज्येष्ठ नागरिकांसाठी वैभववाडीत ‘संवादातून आधार’ मेळावा संपन्न…

पोलीस निरीक्षक सोनलकर यांचा सायबर जागरूकतेवर भर… ⚡वैभववाडी ता.१९-: ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी तसेच सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनलकर यांनी केले.पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस ठाण्याच्या वतीने सवादातून…

Read Full News

विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलला दुहेरी यश…

कुडाळ : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने आणि १७ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.विभागिय स्पर्धेसाठी पाट हायस्कुलचे एकूण चार संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्यातील १४ वर्षे मुलगे व १७ वर्षे मुलगे…

Read Full News

मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य हेच सायकल प्रोजेक्टचे यश…

सौ रश्मी नाईक:इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून चेंदवण येथे २० मुलींना सायकल वितरण.. कुडाळ : चेंदवण सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य हेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सायकल प्रोजेक्टचे यश असल्याचे प्रतिपादन चेंदवणच्या माजी विद्यार्थीनी तथा माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून ‘सक्षम बेटी सक्षम समाज’ अंतर्गत श्री माऊली…

Read Full News

ओटवणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…

बँक ऑफ इंडियाच्या स्टारबाँडिंग उपक्रमाअंतर्गत वितरण.. ⚡सावंतवाडी ता.१९-: बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी बँकेचे ओटवणे शाखा व्यवस्थापक लक्ष्मण बोधवड यांनी लवकरच दिवाळीनंतर गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येणार…

Read Full News

अवैध दारू वाहतूक प्रकरणी बांदा पोलिसांची मोठी कारवाई…

सोलापुरातील दोघे ताब्यात: 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.१९-:बांदा पोलीस ठाण्याच्या पथकाने दारूबंदी अंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल 8 लाख 69 हजार 600 रुपयांचा विदेशी दारूचा साठा व बोलेरो पिकअप वाहतूक वाहन जप्त केले. ही कारवाई विलवडे येथील शिवाजी पुतळा परिसरात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोलापूर…

Read Full News

आकाश कंदील २०२५’ डिजीटल दिवाळी विशेष अंकाचे श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते प्रकाशन…

⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील, श्री जयंतीदेवी मंदिर, पळसंब येथे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या ‘आकाश कंदील २०२५’ डिजीटल दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच माजी सरपंच आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब संस्थेचे सचिव चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. देवी जयंती चरणी प्रार्थनेसह पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर फिजिशियनची नेमणूक…

अँड अनिल निरवडेकर यांचा पुढाकार: तर भाजप युवा नेते विशाल परब व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच सहकार्य.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीकर जनतेने आरोग्य सेवेत स्वयंसहाय्याचा आदर्श घालून दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराला भाजपा युवा नेते विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने यश मिळाले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर फिजिशियन…

Read Full News

कोलगाव येथे पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

⚡सावंतवाडी ता.१९-: मुंबईहून सावंतवाडी-मडुरा येथे येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा आज कोलगाव येथे भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. गाडी रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन धडकली असून गाडीस मोठे नुकसान झाले आहे. अपघात इतका जबर होता की आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही पर्यटक…

Read Full News

You cannot copy content of this page