अवैध दारू वाहतूक प्रकरणी बांदा पोलिसांची मोठी कारवाई…

सोलापुरातील दोघे ताब्यात: 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

⚡बांदा ता.१९-:
बांदा पोलीस ठाण्याच्या पथकाने दारूबंदी अंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल 8 लाख 69 हजार 600 रुपयांचा विदेशी दारूचा साठा व बोलेरो पिकअप वाहतूक वाहन जप्त केले. ही कारवाई विलवडे येथील शिवाजी पुतळा परिसरात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात प्रवीण महावीर बोराडे (वय 30, रा. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर)राम नागनाथ माने (वय 35, रा. आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी दोघांची नावे आहे.पोलीस पथकाने तपासा दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 42 BF 8234) मध्ये गोवा निर्मित “Royal Impact Grain Whiskey” या नावाच्या इंग्रजी दारूच्या 1320 बाटल्या (110 बॉक्सेस) जप्त केल्या. या दारूची एकूण किंमत 3,69,600 रुपये असून वाहनाची किंमत 5 लाख रुपये आहे. या दोन्ही वस्तू मिळून एकूण मालाची किंमत 8,69,600 रुपये इतकी आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कर्मचारी पो.हवा. राजेश गवस, पो.हवा. दादा परब, पो.कॉन्स्टेबल विठ्ठल खरात यांनी केली. तपास अधिकारी म्हणून पो.हे.कॉ. 590 तेली बांदा पोलीस ठाणे यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

You cannot copy content of this page