उबाठाला धक्का,कलंबिस्त गावातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡सावंतवाडी,ता.१९-: भारतीय जनता पार्टीचा प्रभाव देशभरात वाढत असताना, कोकणातही नव्या उत्साहाने पक्षविस्ताराला चालना मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते विशाल परब यांच्या प्रयत्नांतून सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावात उबाठा पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश झाला आहे.

यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून ईनकमींगला नवे गतीमान दिले. या प्रवेशामध्ये कलंबिस्तच्या माजी सरपंच सौ. सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्य सौ. रिया राजेश सावंत, सौ. मेधा तावडे यांचा प्रमुख सहभाग होता. शिवसेना (उ.बा.ठा.) गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश करत पक्षाबद्दलचा वाढता विश्वास प्रकट केला.

या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक रविंद्र माडगावकर, माजी जिल्हा सदस्य पंढरीभाई राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, युवा मोर्चा आंबोलीचे निलेश पास्ते, स्वप्नील रावुळ, पुंडलिक कदम तसेच सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेशामुळे कोकणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भावी काळात पक्षविस्तार आणखी वेग घेईल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page