विशाल परब: नरकासुर स्पर्धेला दिल्या शुभेच्छा..
⚡सावंतवाडी ता.१९-: “स्पर्धेमध्ये जिंकणं किंवा हरवणं महत्त्वाचं नाही; सहभागी होऊन आत्मविश्वास राखणं हेच खरं यश आहे,” असे मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे आयोजित नरकासुर स्पर्धा कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी त्यांनी तरुणांमध्ये सकारात्मकता व आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य भारतीय जनता पक्ष सातत्याने करत असल्याचे सांगितले. “आजच्या तरुणांनी एकत्र येऊन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली आहे, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो,” असे परब यांनी नमूद केले.
कार्यक्रमा दरम्यान त्यांनी जाहीर केले की येत्या २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सावंतवाडीत अभंग आणि भजनांच्या माध्यमातून एक सुंदर सांस्कृतिक सायंकाळ सावंतवाडीकरांना अनुभवायला मिळणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच दीपावलीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आणि पालकमंत्री नितेश राणे तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा परब यांनी दिल्या.
