Headlines

भुईबावडा घाटात भलीमोठी दरड कोसळली..

वाहतूक ठप्प:जेसीबीच्या साहाय्याने युद्धपातळीवर दरड हटवून दुपारी वाहतूक सुरळीत..

वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी रात्रभर जोरदार पाऊस कोसळत होता या पावसाने रविवारी पहाटे भुईबावडा घाटात भलीमोठी कोसळली त्यामुळे गगनबावडा खारेपाटण राज्यमार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून सकाळी 10 वा नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.व दुपार नंतर संपूर्ण दरड बाजूला काढून मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पहाटे 6 वाढ सुमारास रिगेवाडीपासून सुमारे 6 किमी अंतरावर भलीमोठी दरड कोसळली यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरी वाहतूक करुळ घाटमार्ग वळवण्यात आली होती.याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल पाटील राजू कोळेकर यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ सा बा विभागाच्या वतीने जेसीबी लावून सकाळी 10 वा पुर्वी एकेरी वाहतूक सुरू केली.दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर करुन दुपारी 1वा सुमारास संपूर्ण दरड हटवून मार्ग मोकळा केला वाहतूक सुरळीत करण्यात आली.

You cannot copy content of this page