वैभववाडी प्रतिनिधी
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका वैद्यकीय रुग्णालय व उंबर्डे वैद्यकीय रुग्णालय मधे टी.टी. इंजेक्शन ची कमतरता भासत होती ती लक्ष्यात घेत पंचायत समिती सभापती श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या मार्फत ८०० टी.टी. इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.
जनतेच्या आरोग्याची काळजी घेत,लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ही इंजेक्शनने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ पोटे यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी उपसभापती सौ. साची कोलते गटविकास अधिकारी श्री वाघ, माजी सभापती नासीरभाई काझी भाजपा तालुकाध्यक्ष श्री सुधीर नकाशे श्री स्वप्निल धुरी पंचायत समिती सदस्य श्री देवानंद पालांडे श्री मंगेश लोके सौ. सुवर्णा संसारे सौ साधना नकाशे, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी त्याचबरोबर सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभववाडी व उंबर्डे रुग्णालयांना ८०० टी.टी. इंजेक्शन्सचे वाटप…
