Headlines

विशाल परब यांच्यामार्फत आडेलीतील सर्व शाळा हायस्कूल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्ला
भाजपा युवा नेते विशाल परब पुरस्कृत आडेली गावातील सर्व प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला.गेली काही वर्षे विशाल परब सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने विशाल परब यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग मधील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी आडेली येथील कार्यक्रमात काढले. यावेळी भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी राजेश सामंत , सहदेव धर्णे, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक समीर कुडाळकर, सुधीर मुंडये, ग्रा. प. सदस्य प्रतिमा धर्णे, परशुराम धर्णे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रविंद्र धर्णे, सुनील गडेकर, सहदेव धर्णे, साईप्रसाद नाईक, दशरथ गडेकर, माजी पं. स. सदस्य भाऊ गडेकर, दिलीप सोनसुरकर, गार्गी होडावडेकर, सर्व शाळा व हायस्कूल मधील शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page