Headlines

पालकमंत्री,आमदार, खासदार यांचे जिल्ह्यातील विकासाकडे दुर्लक्ष…

रुपेश राऊळ यांचा आरोप:राजघराण्याबद्दल आम्ही कायमच आदर ठेवतो. मात्र निवडणुका हे शेवटी राजकारण आहे.. ⚡सावंतवाडी ता.२१-: जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार हे आज जिल्ह्यातील विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत. जनतेच्या प्रश्नांत त्यांना गांभीर्यच राहिले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचा विसर त्यांना पडला आहे, हे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज…

Read Full News

राधारंग फाउंडेशनतर्फे जिव्हाळा आश्रमात फराळ वाटप…

कुडाळ : राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त रविवारी जिव्हाळा सेवाश्रमास भेट दिली. यावेळी राधारंग फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थीना जिवनावश्यक वस्तूंचे तसेच फराळाचे वाटप केले.आश्रमाप्रती आपल्या भावना, व्यक्त करताना सदस्यांचे मन भरून आले. विशेषत: जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री बिर्जे यांनी चालविलेल्या ह्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतूक केले. तसेच गोशाळे बाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या….

Read Full News

मोहिनी मडगावकर यांच्याकडून नगरपालिका स्वच्छता कामगारांना दिवाळी भेटवस्तू…

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी नगरपालिकेतील स्वच्छता कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात भाजप महिला मोर्चाच्या सावंतवाडी महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी स्वच्छता कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मेघा भोगटे, नगरपालिका कर्मचारी दीपक म्हापसेकर तसेच अन्य कर्मचारी उपस्थित…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जिल्हा कारागृहाकडून सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२१-: सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी तसेच कारागृहातील बंद्यांसाठी सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेला जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडी तसेच जिल्हा सिंधुदुर्ग कारागृहात प्रतिष्ठानतर्फे नियमितपणे आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सामाजिक कार्याची दखल घेऊन…

Read Full News

सावंतवाडीत २५ रोजी दृष्टिबाधितांसाठी स्नेह मेळावा…

⚡सावंतवाडी २०-: नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्ग, या संस्थेचर्फे आयोजित दृष्टिबाधितांसाठी स्नेह मेळावा शनिवारी २५ रोजी सकाळी ११.०० वाजता नब सभागृह, नब नेत्र रुग्णालय, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकरी तृप्ती घोडमिसे आणि जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे उपस्थित राहणार आहेत. तरी नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्गच्या…

Read Full News

अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करत रूपा मुद्राळे आणि सुशांत पांगम यांनी दिले जीवदान…

⚡बांदा ता.२०-: बांदा येथे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना तात्काळ मदत करत सामाजिक बांधिलकी जपत रूपा मुद्राळे व सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम यांनी त्यांना जीवदान दिले. गोवा येथील रहिवासी संतोष कुठेकर (वय ५०) व सानवी कुठेकर (वय ४७) हे बांद्यात सोमवारचा बाजार करण्यासाठी आले असता, गतिरोधकाचा अंदाज न आल्याने…

Read Full News

साटेली गावठणवाडी फलक अनावरण सोहळा उत्साहात संपन्न…!

⚡दोडामार्ग,ता.२०-: आजच्या आश्विन अमावस्या दिनी व दीपावलीच्या शुभमुहूर्तावर साटेली गावठणवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने “साटेली गावठणवाडी” या फलकाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात अनावरण करण्यात आले. यावेळ बुधाजी मोरगावकर, व भिकाजी गणपत्ये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.    या मंगलप्रसंगी ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या आणि वाडीच्या अभिमानाचा आणि ओळखीचा नवा टप्पा साजरा केला. फलकाचे अनावरण झाल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा…

Read Full News

कणकवलीच्या दिक्षा चव्हाणला कॅरममध्ये राज्यस्तरीय रौप्य पदक…

कुडाळ : एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ५९ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी-कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमचा पराभव केला व रौप्य पदक पटकावले. दरम्यान दीक्षाची ग्वालियर-मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद…

Read Full News

फोंडेकर बंधू यांनी पाचव्यांदा पाठविली हापूस आंब्याची पहिली पेटी…

⚡मालवण ता.२०-:गेली पाच वर्षे सातत्याने मालवण कुंभारमाठ येथून हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई पुणे सह परजिल्ह्यात पाठविणारे पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांनी आज दीपावलीच्या मुहूर्तावर दोन डझन हापूस आंब्याची पेटी सातारा येथे अवधूत शिंदे यांच्याकडे पाठविली आहे. सिंधुदुर्ग विशेषतः मालवण मधून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविणारे उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर…

Read Full News

लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलेल्या युवतीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू…

तळवडे-आंब्रड मार्गावर भीषण घटना ; भाऊ किरकोळ जखमी.. कणकवली : लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या युवतीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर रविवारी (ता. १९ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात फोंडाघाट गांगोवाडी येथील निकीता दिलीप सावंत (वय २८) हिचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ वैभव सावंत किरकोळ जखमी झाला…

Read Full News

You cannot copy content of this page