⚡सावंतवाडी २०-: नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्ग, या संस्थेचर्फे आयोजित दृष्टिबाधितांसाठी स्नेह मेळावा शनिवारी २५ रोजी सकाळी ११.०० वाजता नब सभागृह, नब नेत्र रुग्णालय, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकरी तृप्ती घोडमिसे आणि जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे उपस्थित राहणार आहेत. तरी नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्गच्या सर्व लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाकरिता आवश्यक उपस्थित राहावे असे आवाहन नॅब संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद उजगांवकर व सचिव श्री सोमनाथ जीगजींन्नी यांनी केले आहे.
