⚡सावंतवाडी ता.२१-: सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी तसेच कारागृहातील बंद्यांसाठी सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेला जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सावंतवाडी तसेच जिल्हा सिंधुदुर्ग कारागृहात प्रतिष्ठानतर्फे नियमितपणे आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सामाजिक कार्याची दखल घेऊन सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग–२, जिल्हा सिंधुदुर्ग येथील अधिक्षक श्री. सतीश कांबळे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते शुवम सावंत उपस्थित होते.सदर सन्मानामुळे प्रतिष्ठानच्या कार्याला नवी ऊर्जा लाभली असून समाजातील पुनर्वसनात्मक कार्यासाठी ही प्रेरणादायी घटना ठरली आहे.
