मोहिनी मडगावकर यांच्याकडून नगरपालिका स्वच्छता कामगारांना दिवाळी भेटवस्तू…

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी नगरपालिकेतील स्वच्छता कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात भाजप महिला मोर्चाच्या सावंतवाडी महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी स्वच्छता कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मेघा भोगटे, नगरपालिका कर्मचारी दीपक म्हापसेकर तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान स्वच्छता कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले. समाजासाठी योगदान देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून दिवाळीच्या आनंदात सहभागी होण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

You cannot copy content of this page