कणकवलीच्या दिक्षा चव्हाणला कॅरममध्ये राज्यस्तरीय रौप्य पदक…

कुडाळ : एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ५९ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी-कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमचा पराभव केला व रौप्य पदक पटकावले. दरम्यान दीक्षाची ग्वालियर-मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून १६० पेक्षा अधिक खेळाडूंनी तर सिंधुदुर्गच्या १२ खेळाडूंनी सहभाग घेतला. २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी-कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमला कडवी टक्कर दिली. तीन सेट पर्यंत रंगलेल्या या लढतीत दिक्षाला १५ – १६, १८ – ०५, ०४ – २१ असा निसटता पराभव स्विकारावा लागला. .राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सह सचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. तिचे सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम परिवारातर्फे अभिनंदन व स्पर्धेसाठी शुभेच्छा!

You cannot copy content of this page