फोंडेकर बंधू यांनी पाचव्यांदा पाठविली हापूस आंब्याची पहिली पेटी…

⚡मालवण ता.२०-:
गेली पाच वर्षे सातत्याने मालवण कुंभारमाठ येथून हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई पुणे सह परजिल्ह्यात पाठविणारे पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांनी आज दीपावलीच्या मुहूर्तावर दोन डझन हापूस आंब्याची पेटी सातारा येथे अवधूत शिंदे यांच्याकडे पाठविली आहे.

सिंधुदुर्ग विशेषतः मालवण मधून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविणारे उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर हे प्रगतशील आंबा बागायतदार म्हणून ओळखले जातात. गतवर्षी फोंडेकर बंधूनी पाठविलेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला जागतिक मानांकन प्राप्त झाले होते. उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page