Headlines

कोलगाव येथे पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

⚡सावंतवाडी ता.१९-: मुंबईहून सावंतवाडी-मडुरा येथे येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा आज कोलगाव येथे भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. गाडी रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन धडकली असून गाडीस मोठे नुकसान झाले आहे.

अपघात इतका जबर होता की आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही पर्यटक सुखरूप आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नागरिकांच्या मदतीने ती सुरळीत करण्यात आली.

You cannot copy content of this page